पोस्ट्स

त्या कळीच्या कोषामध्ये परिवर्तन होत होते विस्तीर्ण होण्याच्या आशेने मार्ग क्रमित होणाऱ्या त्या पाकळ्या वाढत होत्या मोडीत होत्या स्वताचे इवलेपण पण... तिला माहित नव्हती स्वतःची सौन्दर्यता तिच्यातील मोहिता आणि.. हे हि माहित नव्हतं तिला कि ,हे जग सौन्दर्य आदाशीपणाने हिरावू  पहात कारण ;शाप आहे ह्या जगाला सौन्दर्याचा विनाकारण नाश करण्याचा आणि तेच झालं ! विकृतमनाचे हात  घेऊन गेले तिला कुस्करून टाकल्या तिच्या कोमळ पाकळ्या कोमेजण्यासाठी... कधी न उमळण्यासाठी ... 
पिकलेल पान  बाजूला असलेली हिरवी पाने   त्याच्यावर  हसत होती,  चेष्टेने त्याच्या समोर डुलत होती,  हे सारं पाहून   हृदय जळत होत     त्याचं त्याला हिरवेपण आठवत होतं  कारण तोही हसला होता एकदा   पिकलेल्या पानावर .. ..